शनिवार, १२ सप्टेंबर, २०२०

५ . शेअर मार्केट मध्ये पहिले पाऊल किंवा सुरवात कशी करावी

    मित्रांनो 

ब्लॉग तयार करण्याच कारण  म्हणजे एक वैयक्तिक आणि सुलभ अस वाटत व्यासपीठ असाव जेणेकरून आपल्याला शेअर मार्केट विषयी असणारे काही प्रश्न, त्रुटी, शंका, यांच निरसन व्हावे.

शेअर मार्केट किंवा त्यालाच स्टॉक मार्केट म्हणतात त्याचा एव्हडा बागुलबुवा ना करता ज्याना काही अडचणी असतील त्यांचे लगेच निरसन व्हावे. मित्रानो आपण उदरनिर्वाह म्हणुन काही ना काही उद्योग, काम करतच असतो. मग त्यातून काही शिल्लक असेल तर ती कुठेतरी सुरक्षित ठिकाणी गुंतवतो. मग ती बँक असेल किंवा पोस्ट ऑफिस, पी एफ, सरकारी बॉन्ड, इत्यादी. शेअर मार्केट पण असाच एक सुरक्षित क्षेत्र आहे जिथे तुमच्या गुंतवणुकीला काही कालावधीत पटीत बदल करण्याची ताकद किंवा वाव आहे. मित्रानो राजकारणी लोकांचे मी बारीक निरीक्षण केल त्यांचा तो उत्पन्नाचे स्त्रोत बघितला तर माज्या असा लक्ष्यात आल की त्यांचा 100% पैकी 30% पैसे स्टॉक मध्ये असतात. मग आपण का पाठीमागे राहायच त्यातही कारण पण तसाच आहे कारण हे मार्केट असा आहे जिथे तुमचे पैसे तीन महिने किंवा सहा महिन्यात दुप्पट किंवा पटीत करते. मग आपल्याला प्रश्न पडतात की 

शेअर मार्केट काय आहे?

त्यात सुरवात कशी करायची?

त्यासाठी काही अटी आहेत का?

सुरवात झाल्यानंतर काम कस करायच?

त्यात शेअर खरेदी विक्री करायच की आणखी काही प्रकार आहेत?

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक किंवा ट्रेडिंग का करायची किंवा या मार्केट मध्ये काम का करायच

 


तर मित्रानो हे अस मार्केट आहे जे सर्व क्षेत्रांना जोडल गेल आहे, याला आणखीन बोलायाच झाल तर हे कॉर्पोरेट जग म्हणजे काय तर सर्व मोठ्या कंपनीचे नोंदणी इथ असते. तर शेअर म्हणजे काय? तर एक कंपनी आहे समजा रिलायन्स इंडस्ट्रीज ही ज्यावेळी चालू  झाली त्यावेळी कंपनी चे सुरवातीचे काही भांडवल असणार तर ते भांडवल त्यांना कंपनी वाढावा यासाठी पुरेसे नाही मग त्यांनी काय केल की भांडवल उभा करायच तर ते कस? आहे ते भांडवल आणि आपल्याला आणखीन किती भांडवल लागणार ती रक्कम याना एकत्र करून त्याचे भाग केले तर ते कस

समजा सुरवात होती 70 हजार कोटी लागणार किती एक लाख कोटी तर त्याची बेरीज करून सध्याचे आणि अंदाजे जे भागीदार आहेत त्याने भागले की एक शेअर ची किम्मत तयार होते. याची नोंदणी कुठ असते तर भारतात दोन स्टॉक एक्स्चेंज आहेत. एक NSE नॅशनल स्टॉक एक्स्चेंज आणि दुसरे BSE बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज या दोन्हीपैकी एक ठिकाणी किंवा दोन्ही ठिकाणी याची नोंदणी असते. याच्यावर नियंत्रण कोण ठेवत तर SEBI सिक्युरिटी एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया किंवा सेबी म्हणतात त्याला. आता हे सगळ कुठ आहे तर आपली सर्वांची  स्वप्नाची मायानगरी म्हणजे मुंबई जिथ सगळ्यात जास्त माणूस पैसा मिळवतो. पैसा मिळवणे ठीक आहे. पण पैशापेक्षा जास्त काम आणि त्या कामातून आनंद मिळवणे फार महत्त्वाचे त्यातून मिळालेल्या पैश्याचा घेन गुंतवणुक; आणखी थोडा लाभांश मिळवणे हे तर सर्वाना आवडत. तर आपण कुठ होतो सेबी पर्यंत. 

तर आपण बघितल की शेअर म्हणजे काय, त्याची नोंद कुठे असते, त्यावर नियंत्रण कोण ठेवते? याच्यापुढे आपण कुठून सुरवात करायची; कारण काम आपल्याला करायच आहे. त्यामुळे नोंदणी वैगरे सगळ ठीक आहे पण मी कुठ आहे किंवा आपण कुठ असणार

तर मित्रानो आपल्याला काम करायच आहे तर त्यासाठी आपल्याला अकाऊंट उघडावे लागते. तर ते कसले तर जस बँक अकाऊंट असत बचत किंवा चालू खाते तसलच बघा. काय म्हणतात त्याला? ते असत आपल demat (डिमॅट) आणि trading (ट्रेडिंग) ते कोण उघडत? जशी बचत खात्यासाठी बँक असते तस इथ broker (ब्रोकर) असतो. दलाल म्हणतात मराठीत त्याला. Upstox पण एक असाच ब्रोकर आहे जिथे तुम्ही तुमच अकाऊंट उघडू शकता, तर उरला आता प्रश्न मी काय करतोय इथ की सगळीकडे upstox करत फिरतोय तर मी Subbroker (सबब्रोकर) किंवा Authorised Partner (अधिकृत उमेदवार). तर हा ब्रोकर कुठ जोडलेला असतो participant (पार्टीसिपेंट) असतात या पण दोन आहेत एक NSDL (नॅशनल सिक्युरिटी डिपॉजिटरी लिमीटेड) आणि दुसरी CDSL (सेन्ट्रल डिपॉजिटरी सिक्युरिटी लिमीटेड) म्हणुन. तर ब्रोकर काय असतो DP म्हणजे depository participant (डिपॉजिटरी पार्टिसिपन्ट) 

 

ब्रोकर कडे आपण ही अकाऊंट demat व ट्रेडिंग उघडातो. ट्रेडिंग वरुण खरेदी विक्रीचे व्यवहार करतो तर गुंतवणुक करायची असेल तर ते शेअर तुमच्या demat मध्ये असतात. जेणेकरून वर्ष दोन वर्ष तिथ ठेवले जातात. हे झाले demat व ट्रेडिंग अकाऊंट चे फायदे. हे दोन्ही एक अकाऊंट मधेच म्हणा किंवा application (एप्लिकेशन) मध्ये असत. जिथून खरेदी विक्री करता त्याला ट्रेडिंग (इथ position  पोजिशन असते) म्हणतात तर जिथे शेअर ठेवले जातात त्याला demat (इथ holding होल्डिंग असते) म्हणतात. 

यासाठी कागदपत्रे काय लागतात. तर ही प्रक्रिया ऑनलाईन इंटरनेट वर असते. त्यासाठी तुमचा 

आधार कार्ड मोबाईल लिंक असणारे original

पॅन कार्ड

सही 

बँकेचे गेल्या सहा महिन्याचे स्टेटमेंट

कॅन्सलड चेक

वरील सर्वांचे मोबाईल फोटो

हे सर्व असेल तर अर्ध्या तासात तुमच अकाऊंट उघडत आणि दुसर्‍या दिवसापासून तुम्ही तुमच्या अकाऊंट मधून शेअर चे व्यवहार करू शकता. 

 

आतापर्यंत आपण बघितल  की मी सुरवात कुठून करू शकतो. आता याच्यापुढे प्रत्यक्षात व्यवहार कसा करायचा, आणि त्यात फायदा कसा करायचा. कारण व्यवसाय असो व्यापार असो किंवा उद्योग असो नफा आणि तोटा असतोच. मग आपण काम करत शिकत-शिकत फायदा कसा करून घ्यायचा. तर कस असत समजा आपण शेअर खरेदी केलेत तर, जस भाव अचानक वर गेला की फायदा तसच खाली गेला की तोटा. तर आपण इथ सजग राहून फायदा कसा करायचा हे शिकायच. मग ते इंन्ट्राडे असुदे किंवा शॉर्ट सेल असुदे. आपण नेहमी फायद्यात राहायच. 

 

ट्रेडिंग मध्ये

इंन्ट्राडे म्हणजे एक दिवसात खरेदी विक्री व्यवहार पूर्ण करायचा,

शॉर्ट टर्म(पुजिशनल) ट्रेडिंग म्हणजे 2,5,10,30 दिवस शेअर ठेवायचे

लाँग टर्म म्हणजे 1 ते 12 महिने शेअर ठेवणे होय. 

 

गुंतवणुक 

शॉर्ट टर्म ही 1 ते 10 वर्ष 

लाँग टर्म ही 10 ते 50 वर्ष 

जी वारेन बफेट, राकेश झुनझुनवाला, दमानी यासारखे लोक करतात. 

झुनझुनवाला हे  सुरुवातीला 1990 च्या दशकात आले होते फक्त 5000 हजार घेऊन आज 20000 कोटीचे मालक आहेत. त्यांच्याकडे तेवढ्या किमतीचे शेअर आहेत. 

 

Portfolio - पोर्टफोलियो

Portfolio म्हणजे काय तर खरेदी केलेल्या शेअर चा संचय होय. मग त्यामधे कितीही कंपनी चे शेअर असू शकतात जसे की 5,10,20,50 कंपन्याचे.

 

आपण एखाद्या कंपनीचा शेअर खरेदी करतो म्हणजे आपण त्या कंपनी चे मालक owner किंवा भागीदार होतो. जेवढे शेअर ची संख्या आपल्या demat Portfolio मध्ये तेवढी हिस्सेदारी किंवा भागीदारी आपली त्या कंपनीत असते. त्याठिकाणी तुम्हाला बोर्ड मीटिंग इत्यादी ठिकाणी आपल मत मांडण्याचा अधिकार असतो. तर हे झालं शेअर मार्केट मध्ये शेअर ची भूमिका कुठे असते. त्यात पुढे प्रमोटर म्हणुन असतात तर त्यांची भागीदारी जास्त प्रमाणात असते जसे की 50%,75%,90% अश्या प्रमाणात. बाकीचे शेअर हे किरकोळ ट्रेडिंग किंवा गुंतवणूकीसाठी असतात.

 

शेअर मार्केट मध्ये किती प्रकार

Equity cash, 

Derivative/ option, 

Future. 

 

Equity cash

ज्यामधे फक्त स्टॉक ची खरेदी विक्री होते. 

 

Derivative/option chain

ज्यामधे स्टॉक च्या कि म्मतीला अनुसरून strike price स्ट्राइक किम्मत असते. त्या strike price ला LTP latest traded price म्हणजे लेटेस्ट ट्रेडेड प्राइस असते. हे contract असते जे एक ट्रेडर कडून दुसर्‍याला विकलं जातं. आणि याच्यात लॉट size असते. 

जसे की

स्टेट बँक ऑफ इंडिया 

लॉट size 1lot =3000 

SBI stock ची चालू किम्मत current prise 195 आहे. तर त्यासाठी strike काय असतील तर 

185

190

195

200

205

अश्याप्रकारे 

मग या स्ट्राइक ला काही LTP किंवा त्यालाच प्रीमियम म्हणतात ते पण जवळपास तसाच असत कमी. ते किती असू शकेल sbi साठी 

 

Call.....Strike......Put

5..........185.........1

4.......... 190........2

3............195......3

2............200.......4

1........... 205.......5

 

Call म्हणजे मार्केट bullish बुलिश म्हणजे वरच्या दिशेने जात आहे तिथ खरेदी करायचा. Bearish बेरिश म्हणजे मार्केट खाली जात आहे तिथ shortsell शॉर्टसेल करायचा. 

 

Put मध्ये याच्या उलट असत. 

bullish बुलिश म्हणजे वरच्या दिशेने जात आहे तिथ short sell शॉर्टसेल  करायचा. Bearish बेरिश म्हणजे मार्केट खाली जात आहे तिथ खरेदी करायचा.

हे कशावर अवलंबून आहेत प्रीमियम तर 

Greeks

Implied volatility

Open interest 

Intrinsic value

Volume

हे तुम्हाला पुढच्या भागात सविस्तर करतो. सध्या basic मूलभूत संकल्पना समजून घ्या की काय लागत. 

Call - CE म्हणजे call European

 

Put- PE म्हणजे put European

 

Future साठी fut वापरले   आहे.

 

USDINR- US Doller Indian rupee

 

EQ- Equity cash

 

आता एवढ सगळ बघितल्यावर गोंधळून जाऊ नका, त्याच्यावरचे video  बघितल्यावर सगळ सोप होत. 

 

Mutual fund - मुचुअल फंड- सामूहिक पद्धतीने केलेली गुंतवणुक, मार्केट वेळ- 9.00 ते 3.15

 

Currency--  करन्सी- चलन(डॉलर, यूरो ई. ), मार्केट वेळ- 9.00 ते 4.45 संध्याकाळ

 

Commodity market--कमोडिटी मार्केट-वस्तू (कच्चे तेल, सोन, चांदी ई.), मार्केट वेळ - 9. 00 ते 11.30 रात्रीपर्यंत 

 

हे वरील सर्व demat आणि ट्रेडिंग अकाऊंट मध्ये येत. 

 

Future काय असते.

तर option किंवा derivative सारखाच प्रकार आहे. ज्यामधे ठराविक quantity चे lot असतात आणि महिन्याची expiry date मुदत असते. प्रत्येक महिन्याला नवीन contract असते. Stock किंवा Index असते त्याच्या जवळपास मार्केट किम्मत असते. Index चे फक्त दर आठवड्याला गुरुवारी derivative ची expiry असते.


UPSTOX च्या सुलभ सेवाupstox विषयी थोडं;

 

* ब्रोकरेज intraday फक्त 20/- किंवा 0.05 यातील जे कमी असेल ते प्रत्येक tarde order साठी; Equity, derivative/option, currency, commodty

 

* Delivery trading and investment मोफत trading

 

* margin intraday cover order साठी 20* (20 पट ) आणि delivery साठी 2* (2 पट) 

 

* chart indicator व्यवस्थितपणा 

 

* open view fresh

 

* trading मध्ये सुलभता मोबाईल application द्वारे. 

 

सोप्या शब्दात म्हणजे

 

IPO- इनिशिअल  पब्लिक ऑफर, शेअर ची नोंद NSE BSE या ठिकाणी पहिल्यांदा होत आहे. म्हणजे एकंदरीत शेअर मार्केट मध्ये त्या शेअर ची सुरवात होय. 

 

FPO- फॉलो ऑन पब्लिक ऑफर म्हणजे त्या कंपनी चा शेअर नोंद आहे पण त्यांना आणखी भांडवल आवश्यक आहे त्यावेळी कंपनी शेअर धारक साठी फक्त विशेष करून प्रमोटर त्यांच्यासाठी fpo आणते. प्रमोटर म्हणजे कंपनि चि सुरवात किंवा कंपनि चे मूलभूत अधिकार ज्याच्याकडे असतात ते लोक.



आता राहिला प्रश्न शेअर मार्केट मध्ये काम का करायच. 

तर मित्रानो वेळच बंधन नाही. मार्केट 9.00 ला चालू होत 3.15 ला बंद. मोबाईल Application मधुन काम करू शकतो. पैशाचे नियोजन स्वतः करू शकतो. कितीतरी अधिक पटीत परतावा मिळण्याची संधी असते. 

मित्रांनो उरला प्रश्न काम कस करायचं?

इंट्राडे साठी खालील पद्धत निवडा,

Candlestick chart चा वापर करा.

Time 1,3,5,15  यापैकी कॅन्डेल चा एक प्रकार घ्या. 

 

Vwap, supertrend, macd, rsi, stochastic,moving average-7 आणि 21  हे सर्व indicator चालू ठेवा. 

 

Trend ओळखा आणि जिथं क्रॉस होतंय तिथं Trade घ्या stoploss ठेवा; टार्गेट च्या अर्धा किंवा पाव भाग ठेवा, म्हणजे टार्गेट 1 रुपया असेल तर stoploss 0.25 किंवा 0.5 पैसे ठेवा. म्हणजे मोठ्या तोट्या पासून संरक्षण होते. याला रिस्क रिवॉर्ड रेशों म्हणतात टेक्निकल भाषेत.

 

option contract साठी खालील strategy वापरू शकता,

 

निफ्टी इंडेक्स मध्ये ५ रु व १० रु LTP प्रिमिअमचे call व put खरेदी करू शकतो

call ५ * ७५ = ३७५ व १० * ७५ = ७५०

put ५ * ७५ = ३७५ व १० * ७५ = ७५०

एकूण = ३७५+७५०+३७५+७५०= २२५०

 

बँक निफ्टी इंडेक्स मध्ये १५ रु व ४० रु LTP प्रिमिअमचे call व put खरेदी करू शकतो

call १५ * २५ = ३७५ व ४० * २५ = १०००  

put १५ * २५ = ३७५ व ४० * २५ = १०००  

एकूण = ३७५+१०००+३७५+१०००= २७५०

ज्या ठिकाणी फायदा होतोय त्या ठिकाणी विक्री करा व नफा मिळवा

 

गुंतवणूक

गुंतवणूक व delivery trading करणार असाल तर ५२ week low stock मध्ये ट्रेड घेऊन फायदा मिळवू शकता swing trading च्या माध्यमातून. सोबत youtube वरून cnbc awaz (stock 20-20, jackpot share,pahala sauda, aakhari sauda इत्यादी कार्यक्रम पाहून) व zee business channel वरून stock निवडू शकता 




धन्यवाद 
विकास चौगले

UPSTOX अधिकृत उमेदवार 
९४०४८४४१७०/८८०५४९५२८३

इमेल - vikaschougale77@gmail.com

संपर्क-

whatsapp group वर join व्हा 

https://chat.whatsapp.com/Dgw2SbMd3bTDSWE4ZHyjfi

-------------------------------------------------------------------------------------------------



खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही तुमचे ट्रेडिंग व डिमॅट खाते सुरु करू शकता अधिक माहितीसाठी एक नंबरचा  ब्लॉग पहा,  किंवा मला ९४०४८४४१७०/८८०५४९५२८३ वर संपर्क करा, मी तुम्हाला खाते सुरु करून देतो, सोबत क्लासची सोय उपलब्ध आहे.

http://upstox.com/open-account/?f=5DOQ


शेअर मार्केट डिमॅट व ट्रेडिंग खाते उघडण्यासाठी

 

आधार कार्ड ला जोडलेला मोबाईल क्रमांक-

ईमेल अ‍ॅड्रेस-

आधार कार्ड क्रमांक-

पॅन कार्ड क्रमांक-

जन्मदिनांक-

नाव-

वडिलांचे पॅन कार्ड वरील नाव-

बॅंक खाते क्रमांक-

बॅंक IFSC क्रमांक-

 

खालील pdf किंवा मोबाईल फोटो

सहा महिन्याचे खाते पत्रक (स्टेटमेंट)

सही


कागदपत्रे यादी -

Mobile number आधार link 

Email

आधार कार्ड 

PAN कार्ड 

सहा महिन्याचे बँक statement 

कॅन्सल चेक 

सही 

-----------------------------------------------------------------------------------------------

मित्रांनो, खालील लिंक वरून तुम्ही amazon वरून कोणतीही खरेदी करू शकता discount घेऊन;


https://www.amazon.in/ref=as_li_ss_tl?ie=UTF8&ext_vrnc=hi&ascsub&ext_vrnc=hi&gclid=CjwKCAjwjqT5BRAPEiwAJlBuBdVipQ50xuU-hTVIURpITRh7A0B68RVoxl8jDZyUK38UL9tzx1mZHhoCfCMQAvD_BwE&ref_=nav_ya_signin&&linkCode=ll2&tag=vikaschougale-21&linkId=15aae8b0d40f3ffcc978a3077568cd48


माझे खाते,माझे शेअर!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

६. शेअर मार्केट मध्ये प्रत्यक्षात काम कसे करायचे- ट्रेडिंग खात्यातून

    मित्रांनो  एकदा तुमचं ट्रेडिंग व  डिमॅट   खाते उघडल्यावर तुम्हाला त्यात स्वतः काम करता आलं पाहिजे यांसाठी हा ब्लॉग.   सुरवातीला user i...